• contact@gptarodi.org
  • 8830861830
service photo

    भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमीटेड (बीपीसीएल) व शाळा व्यवस्थापन समिती तरोडी बु. च्या वतीने जि.प. उच्च प्राथमिक शाळा तरोडी बु. येथे स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियानांतर्गत स्वच्छता सप्ताह उपक्रम राबविण्यात आला. या सप्ताहा दरम्यान ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून भारत पेट्रोलीयम कॉपोर्रेशन लिमीटेडच्या वतीने शाळेला मोठ्या कचराकुंड्या भेट देण्यात आल्या.

       यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आरती चिकटे तर बीपीसीएलचे प्रतिनिधी गणेश भोयर, कोमल | वासनिक उपस्थित होते. निरोगी जीवनासाठी

      सार्वजनिक स्वच्छते बरोबरच वैयक्तीक स्वच्छता महत्वाची असून देशासाठी गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छतेकडे लक्ष देऊन आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सरपंच आरती चिकटे यांनी केले. सार्वजनिक आरोग्य चांगले रहावे यासाठी ओला कचरा व कोरडा कचरा वेगवेगळ्या कुंडीत संग्रहित करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, असे मत गणेश भोयर यांनी व्यक्त केले. कार्यकमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक लीलाधर ठाकरे, संचलन नरेंद्र आगलावे तर आभारप्रदर्शन श्रीकांत गणवीर यांनी केले. कार्यकमाचे यशस्वीतेसाठी सहा. शिक्षिका पुष्पा कठाणे, मंगला पराये यांनी परिश्रम घेतले.