• contact@gptarodi.org
  • 8830861830
service photo

उद्दिष्ट

  1. महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना तसेच  समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला  शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  2. राज्यातील नागरिकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांसाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  3. नागरिकांना एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी.
  4. सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

वैशिष्ट्य

  • महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • जिल्ह्यात सुमारे ५ हजार ४५७ कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
  • योजनेअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
  • एकाच पोर्टलवर नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे.
  • या योजनेद्वारे शासन थेट नागरिकांच्या दारी येत आहे.
  • या योजनेअंतर्गत महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच विविध महामंडळांच्या योजनांचा समावेश असणार आहे.